त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत... पंकजा मुंडे संबंधित प्रश्नावर पवारांची प्रतिक्रिया

 त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत... पंकजा मुंडे संबंधित प्रश्नावर पवारांची प्रतिक्रियापुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवार यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी भाजप सांगतं की महाविकास आघाडी सरकार पडेल. पण पंकजा मुंडे यांनी हे राजकारण बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षमपणे राबवावी असं भाष्य केलं. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याबाबत पवारांना विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post