महाराष्ट्र बंद यशस्वी करा, ज्येष्ठ नेते शरद पवार उतरले मैदानात

 शांततामय मार्गाने निषेध नोंदवत महाराष्ट्र बंद यशस्वी करा – खा. शरद पवार सोलापूर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे काही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आले होते. शांततेच्या मार्गाने शेतकरी भाजपच्या सरकारविरोधात निदर्शन करत होते. भाजपचे नेते त्या रस्त्यावर जात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या. त्यात ८ लोक मारले गेले. यापैकी एक पत्रकार होता, दोन सामान्य माणूस होते. पाच ते सहा शेतकरी होते, या सर्वांची माहिती सुप्रीम कोर्टाने मागतिली आहे. तुमच्या हातात सत्ता दिली, ते लोकांचे भले करण्यासाठी मात्र याचे विस्मरण भाजपला पडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप भाजप सरकारने केले. याबद्दल देशभरात संताप आहे, असे प्रतिपादन आदरणीय खा. शरद पवार यांनी सोलापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. 

महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला पाहीजे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने, कायदा हातात न घेता, पोलीस यंत्रणेशी संघर्ष न करता, शांततेने रस्त्यावर येण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी पवार यांनी  केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post