शरद पवारांचा एकेरी उल्लेख... टिकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात...

 

शरद पवारांचा एकेरी उल्लेख... टिकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात...मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय. त्याचबरोबर पवारांबद्दल आदर असल्याचंच पाटील यांनी म्हटलंय. 

शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं. पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही कबुली दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post