बु-हाणनगर व तिसगाव पाणी योजनेबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे महत्वाचे आदेश

 

*बु-हाणनगर व तिसगाव पाणीपुरवठा योजनेबाबत बैठक* -  


नगर: अहमदनगर येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आज,दि.14 रोजी बु-हाणनगर व तिसगाव पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक झाली. याबैठकीस अहमदनगर, राहुरी व पाथर्डी चे गटविकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या गावांमध्ये पाण्याचे मीटर तात्काळ बसविण्यात यावेत. कामात हलगर्जीपणा करण्यात येऊ नये. जिल्हयातील सहा गावांमध्ये ही योजना बंद असून ती पुन्हा चालू करण्यात यावी. या योजनेत सुसुत्रता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेने या पाणीपुरवठा योजनेत लक्ष घालून ही योजना कशी कार्यरत राहील. याबाबत श्री.तनपुरे यांनी सूचना दिल्या.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post