इटली दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मराठीत हृदयसंवाद...व्हिडिओ...

इटली दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मराठीत हृदयसंवाद...व्हिडिओ...

 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर इटलीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर मोदींचे भारतीय समुदायाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्लोक म्हटले. विशेष म्हणजे, यावेळी नरेंद्र मोदींनीइटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत आणि त्यानंतर एका महिलेने मोदींना 'केम छो...' म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीमध्ये संवाद साधला. माही गुरुजी उर्फ महिंद्र सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पोलिस दलात एएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले.  25 वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ते इटलीला गेले होते. त्यावेळी या देशातही भारतीय संस्कृती व आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार करावा, असा साक्षात्कार त्यांना झाला. तेव्हापासून त्यांनी भारत सोडून इटलीला आपले कार्य सुरू केले.   युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह योग आणि अध्यात्माचा प्रचार, प्रसार करत आहेत. 

व्हिडिओ...0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post