खाली पडला, पाण्यात पडला तरी चिंता नाही, 'नोकिया'चा दमदार स्मार्टफोन बाजारात दाखल

 

खाली पडला, पाण्यात पडला तरी चिंता नाही, 'नोकिया'चा दमदार स्मार्टफोन बाजारात दाखलमुंबई : नोकिया XR20 (Nokia XR20) भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड डिझाइनसह येतो. याचा अर्थ असा आहे की हा फोन खूप उच्च आणि खूप कमी तापमानात देखील सुरळीतपणे काम करेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 55 डिग्री ते 20 डिग्री तापमानापर्यंत सुरळीतपणे काम करू शकतो. तसेच, जरी हा फोन 1.8 मीटर उंचीवरून खाली पडला तरी या स्मार्टफोनला काहीही होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन एक तासभर पाण्यात पडून राहिला तरी तो खराब होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, या फोनला चार वर्षे ओएस अपडेट मिळत राहतील..

या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट आणि 6.67 इंच फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्यात प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे आणि अँड्रॉइड 11 वर काम करतो. या फोनमध्ये 1,080 × 2,400 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आले आहे. या फोनमध्ये युजर्सना 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल.

नोकिया XR20 हा 5G स्मार्टफोन आहे  फोन आयपी 68 वॉटर रेझिस्टंटसह येतो. यात 4G LTE, Bluetooth, WiFi 6 आणि 5G सह NFC सपोर्ट आहे. तसेच, यात 3.5 मिमी जॅक आहे. 

नोकिया XR20 ची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 20 ऑक्टोबरपासून हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू रंगात येतो. त्याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post