भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य...अजित पवारांचे 'बाहेर ' राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत...

 

भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य...अजित पवारांचे  'बाहेर ' राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत... सिंधुदुर्ग: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. हे धाडसत्र सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजितदादांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. 

निलेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आहे त्या पदावर राहून माझ्यावर अन्याय होतो असं अजित पवार सांगतात. तुमच्यावर अन्याय कसला झाला? किती वर्ष मंत्रीपदावर आहात? तुमच्या मंत्रीपदाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? म्हणून अजित पवार यांनी रडणं बंद करावं.  अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता, असं राणे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post