जि.प., महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी 'ॲक्शन मोड'मध्ये... मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी

 जि.प., महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी 'ॲक्शन मोड'मध्ये... मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी सर्वांचे आभार मानण्यात आले. तसंच राज्यातील दुकाने आणि व्यापाऱ्यांवरील कोरोना निर्बंध दूर करण्यावर चर्चा झाली. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचंही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता मेळावे घेतले जाणार आहे. तसंच आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील, असंही मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणितं बघून निर्णय घेतले जाणार असल्याचंही मलिक म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post