अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'इनकमिंग', यांनी बांधले घड्याळ

 


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच उद्योग क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले पि. टी. काळे यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. अजितदादा यांनी दोन्ही मान्यवरांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post