२५ हजारांची लाच, ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात


२५ हजारांची लाच, ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यातनगर:  तक्रारदार यांनी दहेगाव(मनमाड) ता. चांदवड येथे घरकुल योजनेअंतर्गत बांधलेल्या घराचा काही भाग अतिक्रमणात असल्यासंबंधने तक्रारदार यांचे विरुद्ध दिवाणी दावा दाखल होता. त्यामुळे तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी पं.स. चांदवड यांना वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल  मिळण्यास विनंती केली होती; त्याकरिता गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना सदरचा अहवाल तयार करण्यास प्राधिकृत केले असता सदरचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने तयार करून देण्याकरिता ग्रामसेवकाने  25 हजारांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार प्राप्त झाले नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक चंद्रकांत तुकाराम पाटील( वय. 42 वर्षे, ग्रामसेवक, दहेगाव(मनमाड) ता. चांदवड ता. नाशिक, रा. सुंदरबन अपार्टमेंट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक.) यास लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.

*सापळा अधिकारी-*  अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि नाशिक 


*सापळा पथक*  

पोह/सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, संतोश गांगुर्डे, पोना/ मनोज पाटील,प्रवीण महाजन,प्रकाश महाजन. 

      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post