4 लाखांची लाच, पोलिस उपनिरीक्षक'एसीबी'च्या जाळ्यात

4 लाखांची लाच, पोलिस उपनिरीक्षक'एसीबी'च्या जाळ्यात नाशिक : नाशिक  ग्रामीणचा एलसीबी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे याला तब्बल 4 लाखांच्या लाच प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्यानं नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकण्याच्या बहाण्याने पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यानं तिथंच सेटलमेंट चालू केली होती. एका बुकीकडे त्याने तब्बल 4 लाखाची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती बुकी आणि शिंदे याच्यात 3 लाखाची डील फिक्स झाली. या प्रकरणात एक वाहनांचा डीलर संजय खराडे हा मध्यस्थाचं काम करत होता. त्यालाही एसीबीने ताब्यात घेतलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post