नगर लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी....'या' माजी आमदाराने दर्शवली रिंगणात उतरण्याची तयारी


नगर लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी.... माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दर्शवली रिंगणात उतरण्याची तयारी नगर: लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीतही लोकसभेचा उमेदवार लवकरच निश्चित करावा अशी मागणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. त्यात आता श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचेही नाव समोर आले आहे. स्वतः मुरकुटे यांनीच एका कार्यक्रमात आपण नगर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटलय. आपण नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त केली आहे. वयाचा निकष न लावता उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post