देवेंद्र फडणवीस म्हणतात 'मी आजही मुख्यमंत्री आहे'.... पंकजा मुंडे म्हणाल्या...

 औरंगाबाद: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे एका कार्यक्रमात 'मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही', असं विधान केलं आहे. त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.


औरंगाबादमध्ये ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून  प्रतिक्रिया दिली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणताच एकच खसखश पिकली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post