दिवाळीनंतर शिवसेना करणार धमाका.... भाजपचे २० नगरसेवक बांधणार 'शिवबंधन'

 दिवाळीनंतर शिवसेना करणार धमाका.... भाजपचे २० नगरसेवक बांधणार 'शिवबंधन'मुंबई, : मुंबई महापालिकाची निवडणुकीच्या  निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने मिशन मुंबई हातात घेतले आहे. पण, शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी भाजपचे 15 ते 20 नगरसेवक डिसेंबर महिन्याच्या आधी सेनेत प्रवेश करतील, असा दावा करून एकच धुरळा उडवून दिला आहे. भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून जोरदार बचाव सुरू झाला आहे.

यशवंत जाधव यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी सत्ताधारी विरूद्ध भाजप असे चित्र पहायला मिळाले आहे. 15 ते 20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे. डिसेंबरमध्ये धमका पहायला मिळेल  असा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशंवत जाधव यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post