तुम्हीच सांगा ठेकेदाराला धरून मारू का? खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा संतप्त सवाल

 

तुम्हीच सांगा ठेकेदाराला धरून मारू का? खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा संतप्त सवालनगर: नगर -शिर्डी- मनमाड  महामार्गाचे काम रखडल्याने भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच ठेकेदाराबाबत  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे  जाहीर तक्रार केली होती.  शेवगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा हा विषय निघाला. त्यावर विखे पुन्हा संतप्त झाले. ‘खासदार म्हणून जे करायचे ते मी करीत आहे. यापुढे जाऊन त्या ठेकेदाराला धरून मारू का? असा उद्विग्न प्रश्नच त्यांनी उपस्थितांना केला. यासंबंधी आपण सोशल मीडियावर मोहीम चालविणार असून याचे काय करायचे, हे आता लोकांनीच सूचवावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

शेवगाव शहरातील एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे याही उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा विषय निघाला. त्यावर भाष्य करताना डॉ. विखे आक्रमक झाले. विखे म्हणाले, ‘ कोविड संसर्गामुळे केंद्र सरकारने बहुतांश निधी लसीकरण आणि अन्य उपाययोजनांच्या कामाकडे वळविला आहे. रस्त्यांच्या कामासाठी आता पैसाच नाही. त्यामुळे सध्या तरी टोल लावल्याशिवाय रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. अहमदनगर -शिर्डी रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले, त्याला जबाबदार ठेकादार आहे. त्याच्याविरूद्ध तक्रारी केल्या. मात्र, उपयोग होत नाही. खासदार म्हणून मी आणखी काय करू शकतो? काम सुरू झाले तर तेथे उभा राहून ते करून घेऊ शकतो. मात्र, तो ठेकेदार जर यायलाच तयार नसेल तर कसे करायचे. मी खासदार म्हणून पाठपुरावा करून थकलो आहे. आता तुम्हीच सांगा, त्याचे काय करायचे? धरून मारायचे का? की गुन्हा दाखल करायचा? काय करायचे ते आता तुम्हीच सांगा. त्यासाठी मी सोशल मीडियात मोहीम सुरू करणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post