पतीने मोबाईल न‌ दिल्याने पत्नीने विळा घेतला व पतीचे ओठच कापले....

 

पतीने मोबाईल न‌ दिल्याने पत्नीने विळा घेतला व पतीचे ओठच कापले....भंडारा : मोबाईलच्या नादात कोण काय करेल याचा काही नेम नाही. भंडाऱ्यात  मासळ एक धक्कादायक घटना येथे घडली आहे. येथे पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे ओठच विळ्याने कापले आहेत. याप्रकरणी पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भंडाऱ्यातील मासळ येथे खेमराज मुल (वय 40) हे याठिकाणी राहातात. वृत्तानुसार, त्यांचा मोबाईल बिघडला होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेतला होता. मोबाइलला घेऊन दोन दिवस उलटून गेले, तरीही त्यांनी पत्नीला तिचा मोबाईल काही परत केला नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 14 ऑक्टोबर) ला पती पत्नीमध्ये मोबाईलवरून जोराचे भांडण झाले. हे भांडण हळू हळू वाढत इतक्या टोकाला गेलं की पत्नीने रागाच्या भरात घरातील विळा च खेमराज यांना फेकून मारला! हा विळा खेमराज यांच्या तोंडावर येऊन लागला आणि त्यात त्यांचे ओठ कापले गेले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post