चर्चा तर होणारच.... आ.विखे पाटील यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 विखे पाटील यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेटनगर: भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या महिनाभरात विखे-पाटील दुसर्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. या भेटीतील चर्चेचा तपशील उपलब्ध नसला तरी या भेटीची जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिर्डीत आयटी पार्क निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भेट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात अमेरिका दौर्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयातून निरोप मिळताच विखे-पाटील दिल्लीला रवाना झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post