घोड्यावर उभे राहून छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण, टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचा 'माफीनामा'

 

आधी घोड्यावर उभे राहून छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण, टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचा माफीनामा



हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे आपल्या एका कृतीमुळे अडचणीत आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण यावेळी ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. त्यांच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

“महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यत्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जातंय”, असं आमदार नवघरे म्हणाले.

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post