हैदराबादला धूळ चारली... तरीही मुंबई इंडियन्स आयपीएल मधून 'आऊट'

 *आयपीएल २०२१*


*विजयानंतरही मुंबई इंडियन्स आयपीएल प्रवास समाप्त.*


गौरव डेंगळे ९/१०(दुबई): आयपीएलच्या १४व्या हंगामात (आयपीएल २०२१) ५ वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सचा प्रवास विजयासह संपला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने लीग शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ४२ धावांनी पराभव केला.अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ईशान किशन व सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीमुळे मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून २३५ धावांचा मोठा डोंगर उभारला. यानंतर हैदराबाद संघ ८ गडी गमावून १९३ धावा करू शकला. हा नेत्रदीपक विजय असूनही मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.जर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना हैदराबादला १७१ पेक्षा जास्त फरकाने पराभूत करावे लागणार होते.अशाप्रकारे,जेव्हा हैदराबादने ६५ पेक्षा जास्त धावा केल्या, तेव्हाच मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.आता कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. मुंबई व कोलकाता नाईट रायडर्सचे सामान १४-१४ गुण झाले.परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ खराब नेट रन रेटमुळे (०.११६) पाचव्या स्थानावर राहिला.नाईट रायडर्स चांगल्या नेट रन रेटने (०.५८७) चौथ्या स्थानावर आहे. सनरायझर्स संघ आठ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.यानंतर इशान किशनने रोहित शर्मासह संघाला तुफानी सुरुवात दिली. दोघांनी ३२ चेंडूत ८० धावांची सलामी भागीदारी केली.रोहित शर्मा (१३ चेंडूत १८ धावा) रशीद खानचा बळी ठरला.त्याने मोहम्मद नबीच्या हाती झेल दिला.हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला पण १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.इशान किशन (८४) तिसऱ्या विकेटसाठी  १२४ च्या सांघिक धावसंख्येवर बाद झाला. किशनने ३२ चेंडूंच्या तुफानी खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार ठोकले.किरॉन पोलार्डला १३ च्या वैयक्तिक धावसंख्येवर जेसन रॉयच्या हाती अभिषेक शर्माने झेलबाद केले. यानंतर सूर्यकुमार यादवने धडाका लावला.त्याने ८२ धावांची दमदार खेळी खेळली.शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो होल्डरचा बळी ठरला.त्याने ४० चेंडूंच्या खेळीत १३ चौकार व ३ षटकार मारले. मुंबईने ९ गडी बाद २३५ धावा केल्या,जी आयपीएलच्या इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. मुंबईचा लोअर ऑर्डर फ्लॉप ठरला,अन्यथा हा स्कोअर आणखी जास्त होऊ शकला असता.

*आरसीबी प्लेऑफमध्ये केकेआरचा सामना करेल, तर दिल्लीचा सामना सीएसकेशी होईल.*

हैदराबादकडून जेसन होल्डरने ४ गडी बाद केले पण ५२ धावा दिल्या. त्याचबरोबर राशिद खान व अभिषेक शर्मा यांनाही २-२ गडी बाद केले. युवा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकनेही इशान किशनच्या रूपात एकमेव गडी बाद केला.२३६ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स संघाचा कर्णधार असलेल्या मनीष पांडेने सर्वाधिक ६९ धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार व २ षटकार मारले व नाबाद परतला. सलामीवीर जेसन रॉयने ३४ व अभिषेक शर्माने ३३ धावांची उपयुक्त खेळी केली. मुंबईकडून जेम्स नीशमने २८, जसप्रीत बुमराहने ३९ व नॅथन कुल्टर-नाईलने ४० धावांत २-२ गडी बाद केले.


*संक्षिप्त धावफलक*


मुंबई इंडियन्स: २० षटकात ९/२३५ ( इशान किशन ८४, सूर्यकुमार यादव ८२, होल्डर ४/५२)

हैदराबाद सनराइजर्स: २० षटकात ८/१९३ ( मनीष पांडे ६९*, जसान रॉय ३९,जेम्स नीशम २/२८)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post