मोठी बातमी....मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक

 

मोठी बातमी....मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक



मुंबई,  : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. अनंत करमुसे या व्यक्तीचं अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जामिनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती.


यासंदर्भात भाजप मंत्री किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं होतं.

अनंत करमुसे प्रकरण राज्यभरात गाजलं होतं. यानंतर आव्हाड यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र जितेंद्र आव्हाड यांना अटक तर झाली मात्र जामीनदेखील तातडीने मिळाला यामुळे विरोध पक्षांकडून टीका केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post