महाराष्ट्र बॅंकेवर भरदिवसा दरोडा, आरोपी अटकेत... कोट्यवधींचे सोनं व रोकड हस्तगत.. नगर कनेक्शनही आले समोर

 

महाराष्ट्र बॅंकेवर भरदिवसा दरोडा, आरोपी अटकेत... कोट्यवधींचे सोनं व रोकड हस्तगतपुणे :  शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून पावणे तीन कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड जप्त केली आहे

डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, अंकुर महादेव पावळे, धोंडीबा महादु जाधव, आदिनाथ मच्छिद्र पठारे, विकास सुरेश गुंजाळ अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपींपैकी दोघे नगर जिल्ह्यातील निघोज येथील आहेत.

21 ऑक्टोबर रोजी दुपारी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र वर दुपारी सव्वा एक वाजता सशस्त्र दरोडा पडला होता. 5 आरोपीनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलचा धाक दाखवून कॅशियर यास हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post