राष्ट्रवादीत कामगार युनियनमधून मोठे इनकमिंग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वागत


राष्ट्रवादीत कामगार युनियनमधून मोठे इनकमिंग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वागत मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या अनेक सदस्यांनी पक्षप्रवेश केला. सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील यांच्या शिफारसीने झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे देखील उपस्थित होते.  


युनियनचे संस्थापक सरचिटणीस दिनकरराव पाटील, अध्यक्ष डी. एस. शिंदे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत रामिष्टे, उपाध्यक्ष संभाजी कोळेकर, उपाध्यक्ष आर. एस. पवार, उपाध्यक्ष सुरेश कोळेकर, सेक्रेटरी गंगाधर खिलारे, सेक्रेटरी दाजी यादव, सेक्रेटरी सुर्यकांत कुराडे आदी मान्यवरांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. 


आमची संस्था यापूर्वी भाजपशी संलग्न होती, मात्र पक्षाचा योग्य सुसंवाद होत नसल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच माथाडी वर्ग हा अधिकतर पश्चिम महाराष्ट्रातील आहे. माथाडी कामगारांना स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर नेहमी आदरणीय शरद पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष डी. एस. शिंदे म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post