'एटीएम' फोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट, नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना, लाखो रुपये लंपास

 एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट, नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना, लाखो रुपये लंपासनगर, :  जिल्ह्यातील लोणी येथे दरोडेखोरांनी एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञातांनी जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून एटीएम फोडलं आहे. रविवारी  पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, डिवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा इंडिकॅशचं एटीएम आहे.

दरोडेखोरांनी हे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडलं आहे. यानंतर दरोडेखोरांनी एटीएममधील 4 लाख 5 हजार रूपयांची रोकड लुटून नेली आहे. स्फोट घडवण्याआधी दरोडेखोरांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post