जिल्ह्यात आणखी २१ गावात लॉकडाऊन, नगर तालुक्यातील 'या' गावचा समावेश

जिल्ह्यात आणखी २१ गावात लॉकडाऊन, नगर तालुक्यातील 'या' गावचा समावेशनगर: करोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी २१ गावात दि.१४ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे.


  

खलील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून ते दिनांक 23/10/2021 रोजी रात्री12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे.


अकोले: विरगाव, सुगाव बु., कळस बु.

कोपरगाव: टाकळी

नेवासा: चांदा

पारनेर : जमगाव, वासुंदे

संगमनेर: उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला,मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे

नगर: पिंपळगांव माळवी

श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post