भाजपचे मनसुबे पाण्यात...एकनाथ खडसे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा...

 एकनाथ खडसे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा...जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे नाना पाटील यांचे अपील फेटाळून लावण्यात आले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा निर्णय नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी दिल्याने खडसे यांचा जळगाव जिल्हा बँक संचालक पदाचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी भुसावळ येथील एका पतपेढी चे कर्ज घेवून ते थकवले असल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post