कर्जफेडीची चिंता... नोटीस येताच नगर जिल्ह्यात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

 कर्जफेडीची चिंता... नोटीस येताच नगर जिल्ह्यातील वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्यानगर: राहुरी तालुक्यातील केसापूर येथील शेतकर्‍याच्या हातात सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आली.  त्यांनी मंगळवारी रात्री झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

केसापूर येथील शेतकरी महादू सहादू कोतवाल (वय 82) यांनी दोन दिवसापूर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज भरण्यासंदर्भात पोष्टाने नोटीस मिळाली. आता हे कर्ज कसे फेडणार कसे? याच चिंतेत ते दोन दिवस हतबल झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा ते घराबाहेर पडले. बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटिशीच्या पाठीमागील बाजूस मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरु नये. मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवनयात्रा संपवित असल्याची चिठ्ठी लिहून त्यांनी रात्री आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post