शेततळ्याचे व अस्तरीकरणाचे अनुदान रखडले, भाजपने दिला आंदोलनाचा इशारा

 

शेततळ्याचे व अस्तरीकरणाचे अनुदान रखडले, भाजपने दिला आंदोलनाचा इशारानगर:  भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या वतीने कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेततळ्याचे आणि अस्तरीकरणाचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळावे या मागणीचे निवेदन तालुका कृषी कार्यालय कर्जत याठिकाणी कृषी अधिकारी शितल पाचरणे आणि उपविभागीय कृषी कार्यालयात कृषी अधिकारी दरेकर साहेब यांना देण्यात आले. शेतकर्‍यांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे यांनी सांगितले. 

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  सचिन पोटरे, तालुका समन्वयक पप्पू शेठ धोदाड, किसान आघाडी तालुकाध्यक्ष श्री. राहुल निंभोरे उर्फ सुपेकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष शरद आण्णा मेहत्रे ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ विलास राऊत, तालुका प्रसिद्धी प्रमुख , गणेश पालवे ,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष हानुमंत गावडे, महिला आघाडीच्या  आशाताई वाघ,  मंदाताई होले ,अपंग आघाडीचे तालुकाध्यक्ष  सुहास गावडे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post