माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांना 'दिवाळीची मिठाई'... विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी

 

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांना 'दीवाळीची मिठाई'... विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणीनगर : विधानपरिषदेच्या नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी दिवाळी नंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या या जागेसाठी भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. खा सुजय विखे पाटील यांनी कर्डीले लवकरच आमदार होतील असे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर कर्डिले यांनी स्वताही तसे सूतोवाच केले. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्डिले यांच्या कडून जिल्ह्यातील  जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, महानगर पालिकेच्या नगरसेवकांना गोड मिठाई पाठवण्यात आली आहे. कर्डिले दरवर्षी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करतात. यंदा त्यांनी दिवाळी फराळाचा परिघ विधान परिषदेच्या मतदारांपर्यंत वाढविल्याने त्यांनी उमेदवारीची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

सध्या नगर विधान परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे आ.अरूणकाका जगताप करतात. पक्षाकडून यावेळी उमेदवार बदलाच्या चर्चा आहे. मात्र पक्षातून अद्यापही कोणी उमेदवारीसाठी स्पष्टपणे दावा ठोकलेला नाही. दुसरीकडे भाजपातून शिवाजी कर्डिले यांनी डाव टाकण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपकडून कर्डिले यांना उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी ते राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील अशीही चर्चा आहे.

गेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण जगताप विजयी झाले होते. यंदा त्यांचे व्याही माजी आ. शिवाजी कर्डिले भाजपकडून इच्छुक आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आहे. या आघाडीकडून कोण लढणार, याची उत्सुकता कायम आहे. राष्ट्रवादीचे माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा दबक्या आवाजात आहे. मात्र पक्ष विद्यमान आ.जगताप यांच्याऐवजी त्यांना संधी देणार का, याची उत्सुकता आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post