अजित पवारांवरील 'आयकर'च्या धाडीत कुठं काय सापडतय.. किरीट सोमय्या यांनी मांडली जंत्री

 अजित पवारांच्या संपत्तीवर धाडी, कुठं काय मिळतय... किरीट सोमय्या यांनी मांडली जंत्रीमुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवारांचं सरकार घोटाळेबाज असून अजित पवारांच्या घोटाळ्यांवर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होईल, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या संपत्तीची माहिती घेण्यासाठी सलग 7 दिवस रेड सुरू असून ही देशातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवारांच्या भिंतीच्या आत असणाऱ्या लॉकरमध्ये काही सापडलं, सर्व्हट क्वार्टरच्या आत जमिनीतून काही सापडलं, असं सांगत त्यांनी पवारांवर चौफेर टीका केली आहे.

आतापर्यंत अजित पवार यांच्याशी संबंधित 24 ठिकाणी  धाडी टाकण्यात आल्या असून  57 जणांची चौकशी झाली आहे. गेल्या चार दिवसांत पवारावर इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत. पण पैशाची टोटल लागत नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. पुण्यात कुठेही पाहिलं तरी पवारांचंच नाव सातबारावर असतं, असा टोला त्यांनी लगावला. रेकॉर्डवर एवढी संपत्ती असेल, तर प्रत्यक्षात किती असेल, असा सवालही त्यांनी केला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post