ठाकरे सरकार करणार नगर जिल्हा विभाजन ? ...भाजपचे मागणीपत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास विभागाकडे....

भाजपकडून पुन्हा नगर जिल्हा विभाजनाची प्रयत्न, मुख्यमंत्री कार्यालयाने प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवला...नगर : भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा विभाजन करावे या मागणीचे निवेदन भाजपचे सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या निवेदनाची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे असल्याचे सांगितले. 

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने 2013मध्येच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र त्यावर आज तागायत काहीही झालेले नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच मुंबई येथे एक बैठक घेतली होती. त्यात शिर्डी विमानतळा लगत एक शहर वसविण्याचे आदेश दिले होते.


वाकचौरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी विमानतळाजवळ नवीन वसविणाऱ्या शहरास उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय करून ' शिर्डी' म्हणून नवीन जिल्हा करावा. या जिल्ह्याचा 'पर्यटन जिल्हा' म्हणून विकास करावा, अशी सूचना केली आहे.

 शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर वसविण्याचे घोषणा केली. याबाबत प्रथमतः आपले हार्दिक अभिनंदन..! अतिशय सुंदर व चांगला उपक्रम आपण घेतला आहे. ही नवीन कल्पना आपणास सुचली याबद्द्ल आपले मनपूर्वक धन्यवाद..! या शहरास नवी मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर नवी शिर्डी असे नाव द्यावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post