जयंत पाटील यांच्या मुलाने थेट 'आयफेल टॉवर'वर जाऊन मुलीला प्रपोज केलं... स्वतः शरद पवारांनी सांगितला किस्सा

 जयंत पाटील यांच्या मुलाने थेट आयफेल टॉवरवर जाऊन मुलीला प्रपोज केलं... स्वतः शरद पवारांनी सांगितला किस्सामुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत   राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा भन्नाट किस्सा सांगितला.  जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. दोघांचं जुळलं. पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असं शरद पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वात आधी जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली. आमचे सर्व सहकारी आहेत. त्यातील एकाला आनंदाची बातमी द्यायाची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांचे चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवा इस्लामपूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरि सवगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल. पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असं सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं पवार म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post