10 हजारांची लाच... जिल्हाधिकारींचा स्वीय सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यात

 

10 हजारांची लाच... जिल्हाधिकारींचा स्वीय सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यातगोंदिया : गोंदियाच्या जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायकाचा अतिरिक्त कार्यभार असलेले  दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेनन यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

तक्रारदाराचे हार्डवेअर आणि भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेनन यांनी यासाठी 10 हजारांची मागणी केली होती.

तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली. तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपी राजेश मेनन यास ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post