भूखंडाचे आमिष दाखवून अत्याचार, बाजार समिती उपसभापतींचा पतीराज अटकेत

 

भूखंडाचे आमिष दाखवून अत्याचार, बाजार समिती उपसभापतींचा पतीराज अटकेतनगर: कृषी उत्पन्न बाजार समितीचा  भुखंड देण्याचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार  केल्याप्रकरणी बाजार समितीच्या  उपसभापतीचा फरार पतीस अहमदनगर येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे.

प्राथ.शिक्षक राजेंद्र विलास गर्जे (रा.पागोरी पिंपळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून 3 आक्टोबर 2021 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल  केला होता. पिडीतेला बाजार समितीचा भुखंड देण्याचे अमिष दाखवून पाथर्डी येथे तसेच तीच्या घरी तीच्यावर बलात्कार केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

गुरुवारी नगर शहरात जिल्हा पोलिस प्रमुखांना खब-याने दिलेल्या माहीती वरुन राजेंद्र गर्जे याला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले व पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.शुक्रवारी तपासी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत डांगे यांनी राजेंद्र गर्जे यास पाथर्डी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बिराजदार यांनी गर्जे याला 29 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post