आता देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर... पवारांना सलग ५ वर्ष मुख्यमंत्री राहता आलं नाही

 

आता देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर... पवारांना सलग ५ वर्ष मुख्यमंत्री राहता आलं नाहीमुंबई :  ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी  केलं होतं.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे.  देवेंद्र फडणवीसांनीही पवारांना खोचक प्रत्युत्तर दिलंय. 

फडणवीस म्हणाले की, फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सलग पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण ते सलग पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. मला एका गोष्टीचं यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालीय. हीच माझ्या कामाची पावती आहे, असं फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post