एकाच दिवशी तीन बालविवाह... वर व वधूचे आईवडील, जवळचे नातेवाईक, पुरोहित, आचारी, मंडपवाल्यांवर गुन्हे दाखल

 

 एकाच दिवशी तीन बालविवाह... वर व वधूचे आईवडील, जवळचे नातेवाईक, पुरोहित, आचारी, मंडपवाल्यांवर गुन्हे दाखलनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे रविवारी दि. २४ रोजी  एकाच दिवशी तीन बालविवाह झाल्याचे उघडकीस आले आहे. चाइल्ड लाइन संस्थेने या घटनेकडे लक्ष वेधल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी वर व वधूचे आईवडील, जवळचे नातेवाईक, पुरोहित, आचारी, मंडपवाले अशा एकूण ३३ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

चाइल्ड लाइन संस्थेला पाथर्डीतील एकनाथवाडी येथे रविवारी तीन बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही घटना एकनाथवाडीचे ग्रामसेवक भगवान भिवसेन खेडकर यांना कळवली. खेडकर यांनी घटनेची खात्री करण्यासाठी गावात भेट दिली. मात्र वºहाडींनी त्यांना माहिती दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे काल, सोमवारी खेडकर यांनी मुलींच्या संबंधित शाळेत, आव्हाळवाडी (शिरूर कासार, बीड) व एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मुलींच्या वयाची खात्री केली. तिन्ही मुलींचे वय १४ वर्षे ३ महिने होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ अन्वये फिर्याद दाखल केली.

एका गुन्ह्यात १० दुसऱ्या गुन्ह्यात १२ व तिसऱ्या गुन्ह्यात ११ आरोपींचा समावेश आहे. दोन मुली एकनाथवाडी येथील आहेत तर एक मुलगी आव्हाळवाडी येथील आहे. आव्हाळवाडी येथील मुलीचा विवाहही एकनाथवाडीमध्येच आयोजित करण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यात यापूर्वीही एका अल्पवयीन मुलीचा दोनदा बालविवाह उघडण्याचा प्रकारही उघडकीस आला.


बालविवाहाबद्दल ग्रामसेवकच अनभिज्ञएकनाथवाडी येथे झालेले तीन बालविवाह, एक गावातील श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात, दुसरा मुलीच्या घरासमोर तर तिसरा मुलाच्या घरासमोर आयोजित करण्यात आला होता. मंगल कार्यालय भाड्याने घेऊन आयोजित केलेले विवाह सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास येतात. त्यामुळे दुर्गम भागात घरासमोर मंडप टाकून किंवा गावातील मंदिरातच आयोजित बालविवाह आयोजित केले जात आहेत. त्यामुळे ते 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post