अपहरण झालेल्या ५ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, नगर जिल्ह्यातील घटना... अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशय

 अपहरण झालेल्या ५ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, नगर जिल्ह्यातील घटना... अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा संशयनगर: नेवासा तालुक्यातील देडगाव येथे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेच्या वेळी अपहरण झालेल्या पाच वर्षीय बालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या दिवशी सायंकाळी घराच्या बाहेर खेळत असलेला सत्यम संभाजी थोरात हा पाच वर्षांचा मुलगा परत आला नाही. त्यामुळे मुलाची आजी प्रमिला शिवाजी थोरात यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

सदर मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नेवासा पोलीस स्टेशनला 803/2021 क्रमांकाने दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमे समाविष्ट करण्यात आली असून भारतीय दंड विधान कलम 302, 201, 363, 364 प्रमाणे प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे वय (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहे.

दरम्यान सदर निर्घृण हत्येचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काल मंगळवारी दुपारी एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की दि 25 रोजी देडगाव येथील शेतात मयत मुलगा सत्यम यांचे गुप्त अंग व हात पाय कापून टाकले तसेच चेहर्‍याला इजा व डोक्याला जबर मारहाण करून गळा कापलेले अवस्थेत मृतदेह आढळून आला व त्याची माहिती पिडीत कुटूंबाला पोलिसांमार्फत मिळाली. सदरचा प्रकार हा अंधश्रद्धेतून घडलेला असल्याबाबत शक्यता मुख्य आरोपीच्या मागील वर्तनातून लक्षात येते.

अपहरणाच्या घटनेनंतर तपासात हलगर्जीपणा करण्यार्‍या व आरोपींना पाठीशी घालणार्‍या व पीडित कुटूंबाच्या मुलाचा तपास करण्यासाठी पैशाची मागणी करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांस तात्काळ निलंबन करून गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post