धाडी पडल्यामुळे कसे थरथर घाबरायला लागले, रावसाहेब दानवेंचा राष्ट्रवादीला टोला

 

धाडी पडल्यामुळे कसे थरथर घाबरायला लागले, रावसाहेब दानवेंचा राष्ट्रवादीला टोलानांदेड:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीसह मुलगा पार्थ पवार यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'आम्ही धाडी टाकयाला लावल्या असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का? असा सवाल करत  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी टीका केली.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत  रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

'आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे. शरद पवार म्हणाले लखीमपूरमधील घटनेवर टीका केली म्हणून माझ्या अजित पवारांवर कारवाई करण्यात आली. जयंत पाटील म्हणाले आता होऊन जाऊ द्या एकदा, भाजप आणि राष्ट्रवादीसोबत, मग आम्ही ही म्हणतो एकटे एकटे या मग होऊन जाऊ द्या एकदाच, असा टोलाही दानवेंनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post