धोनीच्या नेतृत्वात CSK ने चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं

 


इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स  हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.

चेन्नईने ठेवलेल्या 193 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी दमदार सुरुवात केली खरी पण 91 धावांवर अय्यरची विकेट पडली आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली आणि त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ज्यानंतर सामना चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर 27 धावांनी जिंकला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post