फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत, भाजपमधील इतर इच्छुकांनी बोध घ्यावा....

 

फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाहीत, भाजपमधील इतर इच्छुकांनी बोध घ्यावा....मुंबई : भाजप सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस  यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षात कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post