काँग्रेस, शिवसेनेच्या वतीने संयुक्तरीत्या नगरमध्ये महाराष्ट्र बंद

 काँग्रेस, शिवसेनेच्या वतीने संयुक्तरीत्या नगरमध्ये महाराष्ट्र बंद


प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र बंद मध्ये नगर शहरामध्ये काँग्रेस, शिवसेना संयुक्तरीत्या सहभागी झाली. काँग्रेस, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इम्पेरियल चौक येथील पुतळ्यापाशी काही वेळासाठी रास्ता रोको करत निषेध सभा घेतली. नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते देखील यामध्ये सहभागी झाले होते. 
महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारला असल्याने आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आंदोलन करणे अपेक्षित होते. मात्र नगरमध्ये शिवसेना, कॉंग्रेसच्या संयुक्त आंदोलनापासून राष्ट्रवादी चार हात लांबच राहिली. राष्ट्रवादीने स्वतंत्र आंदोलन करून बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे नगरमधील आघाडीतील बिघाडीचीही यानिमित्ताने चर्चा रंगली.


सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे ,शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनिस चूडीवाला, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव मस्के, बाबासाहेब गुंजाळ, बाळासाहेब हराळ आदींसह काँग्रेस, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेसचे अज्जू भाई शेख, मुबीन शेख, अन्वर सय्यद,महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, जरीना पठाण, शारदा वाघमारे, शकीला शेख, कौसर खान, मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्लाट, मोहनराव वाकुरे, हनीफ शेख, शिवसेनेचे आकाश कातोरे, परेश लोखंडे, काका शेळके आदी यावेळी उपस्थित होते. 

 बंदला व्यापाऱ्यांचा ही पाठिंबा

किरण काळे म्हणाले की, आम्ही सर्व व्यापारी संघटनांशी बोललो आहोत. कोरोनामुळे आधीच सगळ्यांचं मोठ आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच दिवसभर दुकान बंद ठेवणं हे व्यापाऱ्यांसाठी देखील गैरसोयीचा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकान बंद ठेवावीत अशा प्रकारची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. परंतु सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला समर्थन असल्याचे आम्हाला सांगितले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post