चंद्रकांत पाटील म्हणतात...खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगला जावई मिळेल....

 

चंद्रकांत पाटील म्हणतात...खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगला जावई मिळेल....नगर:  ज्येष्ठांची चांगली सेवा करीत असल्याने भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगला जावई मिळेल, असे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. विखे पाटील यांच्याकडून केंद्र सरकारची वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. त्याद्वारे ज्येष्ठांना सहाय्यभूत ठरणारी साधने वाटली जात आहेत. त्या केंद्राला पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. 


बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रवरा अभिमत विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी पाटीलही आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी विखे पाटील यांच्यासोबत शिर्डी मतदारसंघातील या उपक्रमाची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे कौतुकही केले. केंद्र सरकारच्या या योजनेत साठ वर्षांवरील ज्येष्ठ नारिकांना आरोग्यासाठी उपयुक्त विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या केंद्रावर नागरिकांशी संवाद साधताना पाटील यांनी विखे पाटलांचे कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. विखे पाटील ज्येष्ठांना आधार देणारे हे पुण्याचे काम करीत आहेत. आई-वडिलांसमान असलेल्या या नागरिकांपर्यंत ते केंद्र सरकारची योजना पोहचवत आहेत. त्यांचे नियोजनही कौतुकास्पद आहे. यातून त्यांना नक्की पुण्य मिळेल आणि त्यांना चांगला जावई मिळेल, असेही पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post