Breaking.....MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर... येथे क्लिक करून पहा निकाल...

 



MHT CET Result 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर  पाहता येईल


भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले गेले आहेत. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post