बुलडाणा अर्बन बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लूट... थरारक व्हिडिओ समोर

  बुलडाणा अर्बन बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लूटजालना : जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना ही आज (28 ऑक्टोबर) दुपारी घडली. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. त्यामुळे कर्मचारी घाबरले. आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले. त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post