नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटना बांधणी तर भाजप जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक, जिल्हा प्रशासनाला दिला इशारा

 नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटना बांधणी तर भाजप जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक, जिल्हा प्रशासनाला दिला इशारानगर: शेवगाव पाथर्डी व नगर तालुक्यातील अतिवृष्ठी मध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसानी बद्दल त्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी व अहमदनगर जिल्ह्यातील खराब व खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी जिल्हा अध्यक्ष श्री.अरुण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.  तातडीने जर यावर कार्यवाही केली नाही तर भाजपा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी  माजी मंत्री श्री.प्रा.राम शिंदे समवेत मा.शिवाजीराव कर्डीले ,आमदार मोनिकताई राजळे ,आ.सौ.स्नेहलता कोल्हे ,सौ.प्रतिभाताई पाचपुते , मा.आ.मुरकुटे , जिल्हा चिटणीस श्री.दिलीप भाऊ भालसिंग , श्री.बाळासाहेब महाडिक व महिला आघाडी तसेच याप्रसंगी सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post