मोठी कबड्डीपटू होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मुलीची भर मैदानात निर्घृण हत्या... ऐन नवरात्रीत महाराष्ट्र सुन्न

 

मोठी कबड्डीपटू होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मुलीची भर मैदानात निर्घृण हत्या... ऐन नवरात्रीत महाराष्ट्र सुन्नमुंबई : पुण्याच्या बिबवेवाडी  परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिली.

मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील बिबेवाडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेमातून तीन तरुणांनी कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेबद्दल अजित पवार यांनी संताप आणि दु:ख व्यक्त केलं

'ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', असं अजित पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post