महाराष्ट्र हादरला... अल्पवयीन मुलीची अनेकांसमोर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

 

महाराष्ट्र हादरला... अल्पवयीन मुलीची अनेकांसमोर कोयत्याने वार करून निर्घृण हत्यापुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. मंगळवारी सायंकाळी ही भीषण घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची ही चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. 

या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post