५० लाखांची लाच.... चक्क मनपा नगरसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात


५० लाखांची लाच.... चक्क मनपा नगरसेवक 'एसीबी'च्या जाळ्यातठाणे:  50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भिवंडी पालिका काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे यांनी केली अटक. पद्मानगर येथील भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने शासकीय जागेवर उभारलेल्या शॉपिंग मॉल संदर्भात पालिकेकडे कारवाई करण्याची मागणी करीत सदर दुकाने वाचविण्यासाठी तसेच दुकानांवर कारवाई टाळण्यासाठी 2 कोटी अथवा फार्म हाऊस नावावर करून देण्याची काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दुकानदाराकडे मागणी केली होती. 

तेथील व्यापाऱ्याकडून पद्मानगर येथे 50 लाख स्वीकारताना एसीबी ठाणे यांनी रंगेहाथ पकडले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post