भिंगारमध्ये अग्नी तांडव, नेहरू मार्केटमधील दुकाने भस्मसात

 

भिंगारमध्ये अग्नी तांडव, नेहरू मार्केटमधील दुकाने भस्मसात




नगर - नगर जवळील भिंगार परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत प्रचंड नुकसान झाले आहे.  या आगीत नेहरू मार्केट मधील २४ पैकी तब्बल 15 दुकाने भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  ऐन सणासुदीच्या काळात ही दुर्दैवी घटना घडल्याने व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळले आहे.

अहमदनगर महानगरपालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी मदत केली. 

आ.संग्राम जगताप यांनीही भिंगार येथील नेहरू मार्केटला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहचण्यासाठी सूचना दिल्या. 

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रवार बाजार मध्ये कपडा मार्केट रात्री 02.30  सुमारास आग लागण्याची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्ष यांना बोलून त्यांच्यामार्फत राहुरी, अहमदनगर, एमआयडीसी, व्ही आर डी अशा 4 अग्निशामक दलांना बोलावून घेऊन, ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देऊन,  शहरातील पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेऊन 05.00 वा च्या सुमारास संपूर्ण आग विझलेली आहे. बाजारांमधील पंधरा दुकाने जळाली असून दहा दुकानांना जळण्यापासून पासून वाचवण्यात आले आहे. घटनास्थळी माननीय पोलीस उपअधीक्षक सोनवणे मॅडम, शहरातील तोफखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आर सी पी असे हजर होते. कुठलीही जीवित हानी झाली नाही.तात्काळ सर्व रात्र गस्त अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आल्याने त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड, ग्रामस्त त्यामध्ये भिंगार मधील नगरसेवक,काँटोमेन्ट चे अधिकारी,कर्मचारी आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी, अशी माहिती कॅम्प पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post