मला लाच दिली जातेय...पोलिसाच्या तक्रारीनंतर लाच देणारे 'एसीबी'च्या जाळ्यात

लाच घेणारा नाही...लाच देणारे 'एसीबी'च्या जाळ्यात


भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने भंडाऱ्यात एक अनोखी कारवाई केली आहे. एसीबीने भंडारा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला 3 हजार रुपयांची लाच देणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. निवास ठाकरे (वय 42 वर्षे), नंदकिशोर ठाकरे (वय 28) अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी  शेतकरी आहेत. तसेच ते ट्रॅक्टरदेखील चालवतात. ते वाळू तस्कर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे


एसीबीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

संबंधित प्रकार हा भंडाऱ्याच्या लाखांदूप पोलीस ठाणे येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. पोलिसांनी वाळू तस्कर आरोपींवर कारवाई करत त्यांचे ट्रॅक्टर जप्त केलं आहे. हेच ट्रॅक्टर परत सोडविण्यासाठी आरोपी संबंधित पोलीस शिपायावर जबरदस्ती 3000 रुपयांची लाच देवून ट्रॅक्टर परत देण्याचा दबाव निर्माण करत होते. पण पोलिसाने वेळीच एसीबीकडे तक्रार केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post