जादा व्याजाचे आमिष दाखवून बॅंक ग्राहकाला १४ लाखांचा गंडा, बॅंकेच्या मॅनेजरचा प्रताप

 जादा व्याजाचे आमिष दाखवून बॅंक ग्राहकाला १४ लाखांचा गंडा, बॅंकेच्या मॅनेजरचा प्रतापनाशिकः जादा व्याजाचे आमिष दाखवून बँक मॅनेजरने बॅंकेच्या  ग्राहकाला 14 लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आडगाव येथील राजेंद्र देवराम जाधव (वय 60) यांचे अॅक्सीस बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्यावर मोठी रक्कम होती. याची माहिती बँक मॅनेजर अमित दिलीप कुलकर्णी (रा. पार्वतीनगर) याला होती. 

त्याने राजेंद्र जाधव यांना फोन करून बँकेत बोलावून घेतले. त्यांना बँकेपेक्षा जादा व्याजाचे आमीष दाखवले. त्यासाठी त्यांच्या खात्यातील रक्कम दुसरीकडे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यापोटी जाधव यांच्याकडून त्याने त्यांच्या सह्याचे धनादेश घेतले. जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्याने वेळोवरी 13 लाख 80300 रुपये काढून घेतले. मात्र, जाधव यांना पुन्हा पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जाधव यांचे व्याज तर बुडालेच, सोबत बँकेतली बचत म्हणून ठेवलेली रक्कमही मॅनेजरने हडपली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेच.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post